टाइमपास फेम दगडू अर्थात प्रथमेशला म्हाडाची लॉटरी
By Admin | Updated: May 31, 2015 14:25 IST2015-05-31T13:52:26+5:302015-05-31T14:25:56+5:30
टाइमपास चित्रपटातील दगडूच्या भूमिकेतून रसिकांवर छाप पाडणा-या प्रथमेश परबला म्हाडाची लॉटरी लागली असून सायनमधील प्रतीक्षानगर येथे प्रथमेशला म्हाडाचं घर मिळाले आहे.

टाइमपास फेम दगडू अर्थात प्रथमेशला म्हाडाची लॉटरी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - टाइमपास चित्रपटातील दगडूच्या भूमिकेतून रसिकांवर छाप पाडणा-या प्रथमेश परबला म्हाडाची लॉटरी लागली असून सायनमधील प्रतीक्षानगर येथे प्रथमेशला म्हाडाचं घर मिळाले आहे. तर विनोदी अभिनयातून प्रेक्षकांना खदखदून हसवणारी अभिनेत्री विशाखा सुभेदारलाही प्रतीक्षानगरमध्येच म्हाडाचे घर मिळाले आहे.
म्हाडाच्या १०६३ घरांसाठी रविवारी सकाळपासून रंगशारदा सभागृहात लॉटरी काढण्यात येत आहे. १ लाख २५ हजार ८८४ अर्जदारांपैकी कोणाला मुंबईत हक्काचे घर मिळते याकडे सर्वच अर्जदारांचे लक्ष लागले आहे. टाइमपास फेम प्रथमेश परबला म्हाडा पावली असून त्याचे मुंबईत हक्काचे घर साकारण्याचे स्वप्न रविवारी पूर्ण झाले. प्रथमेश परब, अभिनेत्री विशाखा सुभेदार या दोघा कलाकारांना प्रतीक्षानगर येथील मध्य उत्पन्न गटातील घराची लॉटरी लागली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून प्रथमेश मराठी सिनेसृष्टीत आला असून प्रथमेशला घर मिळाल्याने परब कुटुंबांमध्य आनंदाचे वातावरण आहे. प्रथमेश सध्या चित्रिकरणासाठी परदेशात असून प्रथमेशी आई प्रिया परब रंगशारदामध्ये उपस्थित होते. प्रथमेशच्या ऐवढ्या वर्षाच्या कष्टाचे चीज झाले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.