शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

एका संवेदनशील पोलीस अधिका-यांच्या समयसूचकतेने ‘आॅटिझम’ग्रस्त मनीषचे बहरले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 02:12 IST

‘घरची उपाशी परिस्थिती आणि या मुलाच्या आजाराला कंटाळून या मुलाला अनाथ सोडून देत आहे. माफ करावे’, अशी चिठ्ठी आणि ३०० रुपये खिशात असणा-या १० ते ११ वर्षांच्या मुलाला अलिबागमधील रिक्षाचालक...

- जयंत धुळप‘घरची उपाशी परिस्थिती आणि या मुलाच्या आजाराला कंटाळून या मुलाला अनाथ सोडून देत आहे. माफ करावे’, अशी चिठ्ठी आणि ३०० रुपये खिशात असणा-या १० ते ११ वर्षांच्या मुलाला अलिबागमधील रिक्षाचालक अनंत दामोदर शेलार यांनी गतवर्षी ७ डिसेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अलिबाग पोलीस ठाण्यात आणले आणि अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्यासह पोलीस ठाण्यातील सारेच अधिकारी व पोलीस यांचे -हदय हेलावून गेले आणि तेथेच अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्यातील संवेदनशील माणूस जागा झाला.मुलाला रिक्षातच बसून ते गृहस्थ झाले गायब....अलिबाग शहरातील जोगळेकर नाका येथे संध्याकाळी सात वाजण्याच्या सूमारास रिक्षाचालक अनंत दामोदर शेलार यांच्या रिक्षामध्ये एक ११ वर्षाच्या मुलासह एक ४५ ते ५० वयाचे गृहस्थ येवून बसले. त्यांनी त्यांना अलिबाग समुद्र चौपाटीवर सोडण्यास सांगीतले. तेथे पोहोचल्यावर त्या गृहस्थांनी, मुलाला रिक्षातच बसूद्या मी आमच्या बरोबरचे दोघे समुद्रावर आहेत त्यांना घेवून येतो, अशे रिक्षा चालक शेलार यांना सांगून, समुद्रावर गेले. एक तास झाला तरी ते गृहस्थ वा अन्य कोणीही रिक्षाकडे परत आले नाही. त्यांनी रिक्षात बसलेल्या मुलाला या बाबत विचारले तर तो मुलगा काही बोलत नव्हता. केवळ मान हलवून हो किवा नाही असे उत्तर देत होता. त्यावरील शेलार यांनी अंदाज केला हा मुलगा मुका असवा आणि काहीसा मानसिक रुग्ण असावा.तो केवळ ‘म’ हे एकच अक्षर लिहितो...अत्यंत संवेदनशिलतेने हळूवार त्या मुलाकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. वराडे यांनी अलिबागमधील समुपदेशक अश्विनी निर्भवणे यांची मदत घेऊन मुलाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याला बोलता येत नाही म्हणून त्याला लिहून सांगण्याकरीता पेन दिले असता तो केवळ ‘म’ हे एकच अक्षर लिहू शकत होता. अखेर वराडे त्यामूलाचे फोटो काढून तत्काळ अलिबाग परिसरा लगतच्या सर्व पोलीस ठाण्यात व्हॉट्सअ‍ॅप द्वारे त्पाठवले, परंतू असा कोणी मुलगा हरवल्याची वा कोणी पाहील्याची माहिती मिळाली नाही.लोकमत आॅनलाइनमुळे मुलाची अखेर ओळख पटलीवराडे यांच्याकडून या मुलाचा फोटो लोकमतला प्राप्त झाला. त्या फोटोसह ‘लोकमत-आॅनलाइन’वर रात्री बातमी प्रसिद्ध झाली. ती बातमी मुलाच्या मामाने पाहून त्या मुलाच्या आई-वडिलांना कळवले आणि अखेर दुस-या दिवशी सकाळी त्या मुलाचे वडील अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल झाले.आणि झालेला उलगडा मोठा धक्कादायक होता. पनवेल जवळचा खांदा गावांत राहाणारे रिक्षा चालक जयंत हुद्दार यांचा हा मुलगा, त्याचे नाव मनिष. मनिष मतिमंद असून तो घरात सतत तोड फोड करतो, त्यांचा त्रास घरातल्यांबरोबर सोसायटीत राहणा-या सर्वांना होतो. शेजाºयांच्या सतत तक्रारी येतात. त्यांच्या आईला तो बेदम मारहाण करतो. आईला तर वेडलागण्याची पाळी आलीय. पाच ते सहा लाख रुपये खर्च उपचाराकरिता केला पण त्यांचा काहीही फायदा झाला नाही. अखेर त्यांला अलिबागच्या चौपाटीवर सोडून देवून मी निघून गेला होतो, अशी वास्तव कहाणी डोळ्यातील पाणि पुसत पुसत मनीष वडील जयंत हुद्दार यांनी वराडे यांना सांगितली. आणि सारेच निशब्द झाले.‘लोकमत-आॅनलाइन’चा माध्यमातून गवसले ‘कॅनडा’स्थित भारतीय नागरिकाचे सहकार्यदरम्यान कॅनडामध्ये राहणारे मूळ भारतीय असलेले एक नागरिक (नाव प्रसिद्ध करु नये अशी त्यांची सुचना आहे)यांनी ‘लोकमत-आॅनलाईन’वरील मनिषची ही सारी कथा आणि त्याला मदत करणा-या पोलीस निरिक्षक वराडे यांनी संवेदनशिलता बातमीत वाचली. आणि बातमीमध्ये असलेल्या वराडे यांच्या मोबाईल नंबरवर त्यांच्याशी संपर्क साधला. मनिषचा पूढील संपूर्ण आयूष्यभराची व्यवस्था आणि खर्च करण्यास आपण तयार असल्याचे सांगीतले. मनीष मतीमंद नाही तर तो आॅटीझम ग्रस्त असण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त करुन, त्याला मुंबईतील हिन्दूजा हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यास सांगितले.मनीषच्या ‘आॅटिझम’ग्रस्ततेवर झाले शिक्कामोर्तबकॅनडास्थित भारतीय नागरीकांने सांगितल्याप्रमाणे सत्वर हिन्दूजा हॉस्पिटलमध्ये मनीषला पाठविण्याची व्यवस्था वराडे यांनी केली. तेथे हैद्राबाद मध्ये ‘आॅटिझम’ग्रस्त मुलांचा सांभाळ, उपाय आणि पुनर्वसन करण्याकरिता सेवाभावी वृत्तीने ‘हैदराबाद आॅटिझम सेंटर’चालविणारे अनिल कुंद्रा दाम्पत्य हे मनिषच्या वडिलांना भेटले. त्यांच्याच सहकार्याने मनिषच्या सर्व आवश्यक चाचण्या डॉक्टरांनी केल्या आणि मनिष मतीमंद नाही तर तो आॅटीझम ग्रस्त असल्याचे कॅनडास्थित नागरिकांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला.

टॅग्स :Policeपोलिस