शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
2
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
3
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
5
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
6
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
7
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
8
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
9
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
10
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
11
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
12
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
13
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
14
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
15
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
16
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
17
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
18
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
19
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
20
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांवर ‘सेल्फी विथ टॉयलेट’ची वेळ ; डोकेदुखी

By admin | Updated: February 2, 2017 14:26 IST

उमेदवारी अर्जासोबत छायाचित्र प्रत बंधनकारक

नाशिक : निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे असेल तर कधी कुठल्या प्रसंगाचा सामना करावा लागेल, याची शाश्वती नसते. तसेच कधी कोणता दुर्दैवी प्रसंग ओढावेल, हेदेखील सांगता येत नाही. सध्या इच्छुकांना अशाच एका प्रसंगाचा सामना करावा लागत आहे, तो म्हणचे चक्क ‘सेल्फी विथ टॉयलेट’चा.निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीच्या नामनिर्देशन अर्जामध्ये लेखी अर्ज जमा करताना त्यासोबत ‘सेल्फी विथ टॉयलेट’चे छायाचित्र जोडणे बंधनकारक केले आहे. हे सेल्फी छायाचित्र जोडल्याशिवाय अर्ज भरण्याची प्रक्रि या यशस्वीरीत्या पूर्ण होत नाही व निवडणूक आयोगाकडून अर्ज ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे इच्छुकांना शौचालय दिसेल असा सेल्फी काढणे अत्यावश्यक आहे. हा सेल्फी काढताना इच्छुकांना कसरत करावी लागत आहे. कारण शौचालय लहान असल्यामुळे इच्छुकांच्या उंचीनुसार जरी शौचालयाच्या दाराजवळ उभे राहून सेल्फी क्लिक केला तरी त्या छायाचित्रात शौचालय असल्याचे दिसून येत नाही केवळ भिंती दिसतात. अशावेळी उमेदवारांना मात्र डोक्याला हात लावण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कमी उंची असलेल्या उमेदवारांचा हा ‘शौचालय सेल्फी’चा प्रयोग यशस्वी होत असला तरी जास्त उंचीच्या उमेदवारांसाठी मात्र हा प्रयोग डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे काही उमेदवारांना कुटुंबातील अन्य सदस्यांची मदत घेत सेल्फी न काढता छायाचित्र काढून घ्यावे लागत आहे. एकूणच सदर बाब सध्या निवडणुकीच्या वातावरणात चर्चेचा मुद्दा बनली असून, महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये तसेच भ्रमणध्वनीवरून काढलेल्या ‘सेल्फी विथ टॉयलेट’चे छायाचित्र काढताना छायाचित्र डेव्हलप लॅबमध्ये हशा पिकत आहे. या अटीमागे निवडणूक आयोगाचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या व भावी लोकप्रतिनिधी होणाऱ्या उमेदवारांच्या घरी शौचालय आहे की नाही हे तपासणे. यासाठी ‘शौचालय सेल्फी’ची अट टाकण्यात आली आहे.---तांत्रिक बाबींमुळे निराशाआॅनलाइन नामनिर्देशन अर्ज भरताना इच्छुक उमेदवारांची दमछाक होत असून, तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना पदरी निराशा पडत आहे. एकीकडे स्लो सर्व्हर तर दुसरीकडे पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी होणारा विलंब आणि उमेदवारीच्या नामनिर्देशन अर्जामध्ये भरावयाच्या माहितीबाबत अत्यंत क्लिष्ट बाबी यामुळे उमेदवारांच्या नाकीनव आले आहे. पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर मुदतीमध्ये नामनिर्देशन अर्ज आॅनलाइन भरणे म्हणचे एक मोठे आव्हान राहणार आहे.