वेळ नदीला पूर
By Admin | Updated: August 19, 2014 23:00 IST2014-08-19T23:00:00+5:302014-08-19T23:00:00+5:30
गेल्या आठवडाभरापासून विश्रंती घेतलेल्या पावसाने मंगळावारी जिल्ह्यातील काही भागांत दमदार हजेरी लावली.

वेळ नदीला पूर
गेल्या आठवडाभरापासून विश्रंती घेतलेल्या पावसाने मंगळावारी जिल्ह्यातील काही भागांत दमदार हजेरी लावली. खेड, आंबेगाव तालुक्यांत काही भागात पाणीच पाणी असा चित्र निर्माण झाले होते. सातगाव पठार भागात वेळ नदीला पूर आला होता. तर पुरंदरवर रूसलेल्या पावसाने येथे 13.7 मि.मी.ची नोंद केली. पावसाने जिल्ह्यात एकीकडे असे चित्र असले तरी इंदापूरकरांवर शेतीला टँकरने पाणी देत असल्याचे विदारक चित्र आहे.
पेठ : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात आज दुपारी तीननंतर पावसाने अचानक दमदार हजेरी लावली. वेळ नदीला पूर येऊन पुराचे पाणी पेठ येथील गावातून जाणा:या पुणो-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून या वेळ नदीचे पाणी बराच वेळ वाहत होते. कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव व पेठ परिसरात हा पाऊस पडला. काही प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. गेले सात ते आठ दिवस पावसाने विश्रंती घेतली होती. शेतक:यांची बटाटा लागवड नुकतीच संपली आहे. शेतकरी थोडा तरी पाऊस पडावा ही अपेक्षा बाळगून होते. ती अपेक्षा आजच्या पावसाने पूर्ण केल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
सातगाव पठार भागात खरीप हंगामातील बटाटा पिकाच्या खुरपणीचे काम चालू आहे. मात्र दुपारनंतर अचानक पावसामुळे हे काम बंद झाले असून, या पावसाने शेतात पाणी साठून राहणार असल्याने खुरपणीची कामे खोळंबणार असल्याची शक्यता शेतक:यांनी वर्तविली.
चाकण/ कडूस : खेड तालुक्यात चाकणकरांना अक्षरश: झोडपून काढले. सायंकाळी 5 वाजता धो धो पाऊस सुरु झाला अन् सगळीकडे पाणीच पाणी करून टाकले . पुणो- नाशिक महामार्गावरून पावसाचे पाणी वाहत होते. येथील कोहिनूर सेंटर मधील तळघरातील आवारात पाणी घुसले होते. त्यामुळे दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली .
कडूस परिसरातील ओढे-नाले पाण्याने भरून वाहत होते. अचानक जोरदार आलेल्या पावसामुळे दोंदे येथील ओढय़ावरील पुलावरून पावसाचे पुराचे पाणी आल्यामुळे दोंदे येथील लक्ष्मण रोकडे (वय 52) वाहून गेल्याची घटना घडली आहे. दोंदे, कडूस, रानमळा आदी भागांत एक तास हजेरी लावली.
कडूस रस्त्यावरील ओढय़ावर पुराचे पाणी आल्यामुळे राजगुरुनगरकडून कडूसकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी सहानंतर पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. (वार्ताहर)
वाहतूक ठप्प : दोंदे येथील सुकाळेवस्ती येथील ओढय़ावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे कडूस गावाकडे जाणारी वाहतूक जवळपास तीन तास खोळंबली होती.
पुरंदर तालुक्यात 13.7 मिमी.
सासवड : सासवडसह पुरंदरमध्ये दुपारी 1 ते 2 दरम्यान 13.7 मिमी. पाऊस पडला आहे. अजून दोन दिवस असे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
जून महिन्यापासून आतार्पयत 254.7 मिमी. पाऊस झाला असून, ऑगस्टच्या अखेरीस जून व जुलै महिन्याची सरासरी गाठली आहे. जून ते ऑगस्टअखेर्पयत 35क् मिमी.र्पयतची पावसाची सरासरी आहे. वाटाणा, कांदा व पालेभाज्याचे बी महागाईचे घेऊन शेतात पेरणी केली ते उगवण्यासाठी पावसाची आवश्यकता होती.
4गेल्या 15 दिवसांपासून
पावसाने ओढ दिल्याने शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. बाजरी, वाटाणा, कांदा व पालेभाज्या ही पिके पाऊस वेळेवर न पडल्याने घेता आली नाहीत. खरीप हंगाम वाया गेला. रब्बी हंगामात पुरेसा पाऊस झाला, तर शेतकरी ज्वारी, गहू, कांदा, हरभरा, वाटाणा व पालेभाज्या ही पिके घेता येतील.