शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

ताडोबातील वाघीण चार पिल्लांसह पर्यटकांना घालत आहे भुरळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 17:26 IST

हमखास व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा देशातच नाही, तर जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

- साईनाथ कुचनकारचंद्रपूर -  वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबामध्ये मागील  दोन दिवसांपासून पर्यटकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. कोलार बफरमधील मदनापूर-पळसगावजवळ एक वाघीण आपल्या चार  बछड्यांसह जंगलात फिरताना पर्यटकांना दिसली. याचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल  होत आहे.हमखास व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा देशातच नाही, तर जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ताडोबातील भौगोलिक स्थिती वाघांसाठी पोषक असल्यामुळे मागील काही वर्षांमध्ये येथे वाघांचा जन्मदर वाढल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.  ताडोबातील कोअर झोन क्षेत्र वाघांसाठी कमी पडू लागले असून भक्ष्याच्या शोधात अनेकवेळा वाघ बफर क्षेत्रामध्ये फिरताना आढळतात. दोन दिवसांपूर्वीच ताडोबातील कोलार बफरमधील मदनापूर-पळसगावजवळ वाघीण आपल्या चार बछड्यांसह कोवळ्या उन्हामध्ये फिरत असल्याचे पर्यटकांना दिसली.  विशेष म्हणजे, धोका टाळण्यासाठी वनविभाग या बछड्यांकडे बारिक लक्ष ठेवून आहे. या बाघिणीसह तिच्या बछड्यांना बघण्यासाटी  या क्षेत्राच जाणाºया पर्यटकांची संख्या सध्या वाढली आहे. वाघाची दहशतमागील काही दिवसांपासून वाघांची संख्या वाढल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची दहशत आहे.  दोन दिवसापूर्वी चंद्रपूर शहरातील इरई नदीच्या पात्रामध्ये वाघाचे दर्शन झाल्याने वनविभागासह जिल्हा प्रशासन जागे झाले. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहे. शहरानजिक वाघाचा संचार वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :TigerवाघTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पMaharashtraमहाराष्ट्र