शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

तिकीट चोरीचा दंड आता ५०० पट

By admin | Published: August 24, 2016 3:32 PM

तिकीट चोरी रोखण्यासाठी एसटी महामंडळाकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहे. यापूर्वीच्या वेतनवाढ रोखणे, बडतर्फ करणे या कारवाईचाही प्रभाव होत नसल्याने आता अगडबंब दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

 

विलास गावंडे
यवतमाळ, दि. २४ -  तिकीट चोरी रोखण्यासाठी एसटी महामंडळाकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहे. यापूर्वीच्या वेतनवाढ रोखणे, बडतर्फ करणे या कारवाईचाही प्रभाव होत नसल्याने आता अगडबंब दंडाची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या चोरीचा दंड प्रवास भाड्याच्या ५०० पट असणार आहे. अर्थात यवतमाळ-नागपूर (१५९ रुपये प्रवास भाडे) तिकीटाची चोरी सापडल्यास वाहकाला ७९ हजार ५०० रुपये दंड केला जाणार आहे. दंडाच्या या नव्या नियमावलीने एसटीच्या राज्यातील ४० हजार वाहकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. 
एसटी महामंडळाचा वाहक हा उत्पन्नाचा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र काही वाहकांकडून स्वत:च्या आर्थिक लाभासाठी तिकीटांची चोरी केली जाते. महामंडळ तोट्यात जाण्यास हा प्रकार सर्वाधिक जबाबदार असल्याची ओरड होते. त्यामुळेच तिकीट चोरी नियंत्रणात आणण्याकरिता कारवाईच्या नाना तºहा अंमलात आणल्या जात आहे. तिकीट चोरी सापडल्यास यापूर्वी वाहकाची वेतनवाढ रोखणे, बडतर्फ करणे आदी प्रकारची कारवाई केली जात होती. शिवाय वाहकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जात होती. आता मात्र जागेवरच दंड ठोकला जाणार आहे. 
तिकीट चोरीच्या कारवाईसाठी वेगवेगळे टप्पे पाडण्यात आले आहे. पहिल्यांदा आढळलेल्या तिकीट चोरी प्रकरणात प्रवास भाड्याच्या ५०० पट किंवा दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड केला जाणार आहे. कारवाईनंतरही काही वाहकांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याचा एसटी महामंडळाचा अनुभव आहे. म्हणूनच दुसºयांदा तिकीट चोरी करताना आढळणाºया वाहकावर प्रवास भाड्याच्या ७५० पट किंवा १५ हजार रुपये एवढी रक्कम वसूल केली जाणार आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा दंड होऊनही चोरीची सवय न सोडणाºया वाहकांवर तिसरी कारवाई निलंबनाची असणार आहे. 
तिकीट चोरी प्रकरणाची प्रलंबित प्रकरणेही तडजोड करून निकाली काढली जाणार आहे. यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय तरतुदीचा अवलंब केला जाणार आहे. अपहार प्रकरणात होणाºया तडजोडी आणि दंडाची रक्कम वसूल करण्याची जबाबदारी विभागीय वाहतूक अधीक्षक, विभागीय लेखा अधिकारी आदींवर टाकण्यात आली आहे. अपहाराची प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी महामंडळाने हे धोरण निश्चित केले आहे. 
तर इतर विभागात पदस्थापना
तिसºयांदा तिकीट चोरीप्रकरणी निलंबित किंवा बडतर्फीची कारवाई झालेल्या वाहकाला अपवादात्मक प्रकरणात इतर विभागात पदस्थापना दिली जाणार आहे. अपिल किंवा न्यायालयाने दिलेल्या आदेशाने महामंडळाच्या सेवेत दाखल होत असलेल्या कामगाराला वाहक म्हणून नियुक्ती नाकारली जावून इतर ठिकाणी पदस्थापना दिली जाणार आहे.