२३ दिवसांत भागवली १०० गावांची तहान
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:05+5:302016-06-07T07:43:05+5:30
रिलायन्स फाउंडेशनने एक महिन्यापूर्वी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्याची मोहीम सुरू केली

२३ दिवसांत भागवली १०० गावांची तहान
मुंबई : रिलायन्स फाउंडेशनने एक महिन्यापूर्वी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्याची मोहीम सुरू केली. लातूर, हिंगोली, जालना आणि नांदेड या चार जिल्ह्यांमधील १०० दुष्काळग्रस्त गावांची माहिती झाल्यानंतर, फाउंडेशनने ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली.
अवघ्या २३ दिवसांत ‘मिशन राहत’ राबवून १००हून अधिक गावांना दर दिवशी दोन ते चार टँकरने पाणी पुरविले. आतापर्यंत या गावांमधील दोन लाख दुष्काळग्रस्त नागरिकांना २० दक्षलक्ष लीटर्सहून अधिक पाण्याचा पुरवठा केला आहे. रिलायन्स फाउंडेशनने सरकारी संस्थांच्या साह्याने मराठवाड्यांतील चार जिल्ह्यांत सर्वांत जास्त दुष्काळग्रस्त गावे शोधून काढली. फाउंडेशनच्या चमूने या ठिकाणी पाणीपुरवठा करण्याची साधने घेऊन गावकऱ्यांना मदत केली.