‘हत्ती मोहीम’ पुस्तकातून देशभरात

By Admin | Updated: March 19, 2015 23:51 IST2015-03-19T22:22:21+5:302015-03-19T23:51:34+5:30

सिंधुदुर्ग वनविभागाचा उपक्रम : ‘मिशन एलिफंट’ इंग्रजीतून प्रसिद्ध

Through the 'elephant campaign' book nationwide | ‘हत्ती मोहीम’ पुस्तकातून देशभरात

‘हत्ती मोहीम’ पुस्तकातून देशभरात

अनंत जाधव - सावंतवाडी -- महाराष्ट्रात प्रथमच सिंधुदुर्ग वनविभागाने यशस्वीपणे राबवलेली हत्ती पकड मोहीम आता पुस्तकरुपाने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. यासाठी वनविभागाने ‘मिशन एलिफंट’ या नावाने इंग्रजीतून पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाच्या पहिल्या प्रती देशाचे वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आल्या आहेत. मोहिमेत विशेष लक्ष घालणारे खासदार विनायक राऊत यांनी हे पुस्तक केंद्रीयमंत्री व खासदारांना सुपूर्द केले आहे.
जिल्ह्यात मार्च २०१३ मध्ये दाखल झालेल्या उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी जिल्ह्यात तळ ठोकलेल्या चार हत्तींचा अभ्यास केला. उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून हत्ती पकड मोहिमेला परवानगी मिळविली. परवानगी मिळाल्यानंतर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कर्नाटक सरकारशी संपर्क साधला. वनमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार यांचीही मदत घेतली. ८ ते १६ फेबु्रवारी २०१५ या अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत मोहीम यशस्वी झाली.
सिंधुदुर्गवासीयांबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात या यशस्वी मोहीमेची गाथा जावी, यासाठी वनविभागाने या मोहिमेची खास पुस्तकरुपी माहिती तयार केली आहे. या पुस्तकात हत्ती पकड मोहिमेबरोबरच हत्तींनी गेल्या काही वर्षात केलेले नुकसान तसेच हत्तीहल्ल्यात मृत पावलेले व जखमी ग्रामस्थ या माहितीसह मोहिमेसाठी कोणी कसे प्रयत्न केले, कर्नाटकमधून कोणत्या जंगलातून हत्ती आले, तसेच त्यांना लागणारी साधन सामुग्री, येथील हवामान याबाबतची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे. हे पुस्तक उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांच्या कल्पनेतून तयार झाले असून, त्यांना सहाय्यक उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी यांचीही साथ लाभली आहे.
सध्या या पुस्तकाच्या प्रती इंग्रजीमधून प्रसिद्ध करण्यात आल्या असून, वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर यांना पुस्तके देण्यात आली आहेत. खासदार विनायक राऊत यांनी हे पुस्तक संसदेत केंद्रीय मंत्री व खासदारांना प्रदान केले.


मोहीम स्मरणात राहण्यासाठी पुस्तक : एस. रमेशकुमार
मोहीम आमच्यासाठी महत्त्वाची होती आणि ती यशस्वीही झाली. पुस्तकरुपाने ही मोहीम लोकांच्या कायम स्मरणात रहावी, यासाठी पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे, असे मत उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी व्यक्त केले.

Web Title: Through the 'elephant campaign' book nationwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.