मतदानापूर्वी भाजपाकडून पत्रकांचं वाटप, तीन जण ताब्यात

By Admin | Updated: February 21, 2017 08:33 IST2017-02-21T08:33:33+5:302017-02-21T08:33:33+5:30

पुण्यातील नवी पेठ भागात मतदानाआधी पत्रके वाटताना भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Three years before the vote, the BJP distributed all the letters | मतदानापूर्वी भाजपाकडून पत्रकांचं वाटप, तीन जण ताब्यात

मतदानापूर्वी भाजपाकडून पत्रकांचं वाटप, तीन जण ताब्यात

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 21 -   पुण्यातील नवी पेठ भागात मतदानापूर्वी पत्रके वाटताना भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी पहाटे भाजपाचे उमेदवार धीरज घाटे यांची पत्रके वाटली जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नवीपेठ-पर्वती भागातील प्रभाग क्रमांक 29 मधील ही घटना आहे.  
 
पोलीस गस्त घालत असताना त्यांना धीरज घाटेंचे कार्यकर्ते पत्रकं वाटताना आढळली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत तिघांनाही ताब्यात घेतले. 
 
या घटनेची अधिक चौकशी सध्या पोलीस करत आहेत. शिवाय, याबाबतची माहिती निवडणूक आयोगालाही देण्यात येणार आहे.  
 

Web Title: Three years before the vote, the BJP distributed all the letters