नालेसफाईत तीन कामगारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 03:05 IST2017-02-17T03:05:51+5:302017-02-17T03:05:51+5:30

एका खासगी ड्रेनेजची सफाई करताना मालवणीत गुरुवारी सकाळी तीन कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी

Three workers died in Nalesfai | नालेसफाईत तीन कामगारांचा मृत्यू

नालेसफाईत तीन कामगारांचा मृत्यू

मुंबई : एका खासगी ड्रेनेजची सफाई करताना मालवणीत गुरुवारी सकाळी तीन कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी लेबर कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहेत.
मूर्तीभाई हरिजन (३०), माया हरिजन (२६) व काशी हरिजन अशी या तीन मयत कामगारांची नावे आहेत. मालवणी चर्च परिसरात असलेल्या माणकुबाई हाऊस, राम मंदिर येथील एका चाळीच्या ड्रेनेजच्या सफाईसाठी कंत्राटदाराने त्यांना पाठविले होते. त्यानुसार सकाळी हे तिघे ड्रेनेज सफाईसाठी उतरले होते. काम सुरू असताना साडेनऊच्या सुमारास मूर्तीभाईची तब्येत बिघडली. त्यामुळे कंत्राटदाराने त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मागोमाग माया आणि काशी यांचीही प्रकृती बिघडल्याने ते बेशुद्ध झाले. त्याबाबत अग्निशमन दलाला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना रुग्णालयात पोहोचविले. मात्र डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले मास्क, हँडग्लोज हे कंत्राटदाराने त्यांना पुरविले नव्हते. त्याच्या निष्काळजीपणामुळे या तिघांचा बळी गेला. (प्रतिनिधी)

Web Title: Three workers died in Nalesfai