नवापूरजवळ अपघातात तीन महिला ठार
By Admin | Updated: November 9, 2014 01:59 IST2014-11-09T01:59:05+5:302014-11-09T01:59:05+5:30
ट्रक व जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन महिला जागीच ठार झाल्या.

नवापूरजवळ अपघातात तीन महिला ठार
नवापूर (जि. नंदुरबार) : ट्रक व जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन महिला जागीच ठार झाल्या. तसेच जीपमधील 11 प्रवासी व ट्रकचा सहचालक असे 12 जण जखमी झाले आहेत. ही घटना धुळे - सुरत राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास गंगापूर गावाजवळ घडली़
जेहरा रोनक (7क्), नकय्या रोनक (16) व मुनीरा अब्बास नजमी (45) अशी मृतांची नावे आहेत़ या अपघातात जीपमधील तीन महिला जागीच ठार झाल्या. अपघात इतका भीषण होता की, जीप चक्काचूर झाली असून, ट्रकचा बॉडीपासून सांगाडा वेगळा झाला. जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर खाजगी रुग्णालयांमध्ये पाठविण्यात आले. या अपघाताप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)