शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' कोरोनाबाधित २२९ विद्यार्थ्यांची दैनंदिन तीनवेळा आरोग्य तपासणी; कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत अन् व्हिडीओ कॉलचीही सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 20:32 IST

covid 19 in washim: रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील बाधित सर्व २२९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

वाशिम : रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील बाधित सर्व २२९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. या शाळेतील कोरोना बाधित विद्यार्थ्यांची आरोग्य विभागाच्या पथकाकडून दिवसातून तीन वेळा आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २६ फेब्रुवारी रोजी पुन्हा शाळेला भेट देवून आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, तहसीलदार अजित शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.

देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील २२९ विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाºयांचे पथक शाळेमध्ये तैनात करण्यात आले. त्याचबरोबर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. आरोग्य विभागाने तातडीने या सूचनांची अंमलबजावणी करून या शाळेमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच या शाळेचे तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. येथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी पुन्हा शाळेला भेट दिली. तसेच सद्य:स्थिती जाणून घेतली.व्हिडीओ कॉलिंगद्वारे विद्यार्थ्यांचा पालकांशी संवादबाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील १५१, यवतमाळ जिल्ह्यातील ५५, बुलडाणा जिल्ह्यातील ३, अकोला जिल्ह्यातील १, हिंगोली जिल्ह्यातील ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संबंधित जिल्हा प्रशासन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांना विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती यापूर्वीच पाठविण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे संपर्क करून दिला जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwashimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस