‘एसटीमध्ये तीन हजार चालकांची भरती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:27 IST2018-08-20T00:26:29+5:302018-08-20T00:27:10+5:30
राज्यात तीन हजार चालकांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

‘एसटीमध्ये तीन हजार चालकांची भरती’
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाची कार्यपद्धती पारंपरिक आहे. त्यात चालक-वाहकांची ड्युटी लावण्यामध्ये मोठा गोंधळ आहे. तो दूर करण्यासाठी त्यांची ड्यूटी संगणकीय पद्धतीने लावण्यात येणार आहे. तसेच राज्यात तीन हजार चालकांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
रावते यांनी रविवारी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसराची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. या वेळी कार्यशाळांतील अस्वच्छतेबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्या कार्यालयातील कोल्हापूर जिल्ह्याचा इंग्रजीतील नकाशा बदलून मराठीत लावण्याच्या; तसेच नवीन गणवेश न घालणाºया कर्मचाºयांना नोटिसा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.