शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कालबद्ध पदोन्नतीचे दोनऐवजी तीन टप्पे : सरकारी कर्मचाऱ्यांना ४ ते १४ हजारांची मिळणार वेतनवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 06:59 IST

राज्य सरकारी कर्मचारी अधिका-यांना सातव्या वेतन आयोगानुसार साधारणत: १५ टक्के वेतनवाढ दिली जाणार असून त्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

- यदु जोशीमुंबई : राज्य सरकारीकर्मचारी अधिका-यांना सातव्या वेतन आयोगानुसार साधारणत: १५ टक्के वेतनवाढ दिली जाणार असून त्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. वर्ग चार ते वर्ग एकपर्यंतच्या कर्मचाºयांना चार हजार ते १४ हजार रुपयांपर्यंतची मासिक वेतनवाढ दिली जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.राज्यातील १७ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचा-यांना वेतनवाढीची आणि सात लाख सेवानिवृत्त कर्मचा-यांना निवृत्ती वेतनातील वाढीची नववर्ष भेट देण्याची पूर्ण तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचे वेतन मासिक चार ते पाच हजार रुपयांनी, क गट म्हणजे तृतीय श्रेणी कर्मचाºयांचे वेतन पाच ते आठ हजार रुपयांनी तर अ आणि ब गट अधिकाºयांचे वेतन नऊ ते १४ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येणार असला तरी प्रत्यक्ष वेतनवाढ ही फेब्रुवारीच्या पगारात होईल. १ जानेवारी २०१६ पासूनची तीन वर्षांची थकबाकी ही पाच समान हप्त्यांमध्ये कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा करण्यात येणार आहे. सेवानिवृत्तांना ती रोखीने दिली जाईल. त्याचा सरकारी तिजोरीवर ४२ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल. ही थकबाकी पुढील आर्थिक वर्षात दिली जाईल. वेतनवाढीमुळे दरवर्षी सुमारे २१ हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडेल.घरभाडे भत्त्यावरून मात्र सरकार व कर्मचारी संघटनांमध्ये संघर्षाची चिन्हे आहेत. कारण, केंद्र सरकारप्रमाणे घरभाडे भत्ता द्यावा अशी संघटनांची मागणी आहे. राज्य सरकार सातव्या वेतन आयोगाबाबत घेणार असलेल्या निर्णयामध्ये या मागणीचा समावेश नसल्याची कुणकुण लागल्याने संघटनांचे नेते अस्वस्थ आहेत.अधिका-यांचे ५ जानेवारीला सामूहिक रजा आंदोलन वेतन आयोग घरभाडे भत्त्यासह द्या, पाच दिवसांचा आठवडा करा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करा, सर्व रिक्त पदे भरा या चार मागण्यांसाठी राजपत्रित अधिकारी महासंघ ५ जानेवारीला एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन करणार आहे, अशी घोषणा महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी केली आहे.असे आहे वेतनवाढीचे सूत्रसरकारी कर्मचा-यांना साधारण किती वेतनवाढ मिळणार हे जाणून घ्यायचे असेल तर हे करा...१ जानेवारी २०१६ रोजीचे तुमचे मूळ वेतन अधिक ग्रेड पे यांची बेरीज करून आलेल्या संख्येला २.५७ ने गुणायचे. संंबधित रक्कम वेतनवाढ असेल.कालबद्ध पदोन्नतीचे तीन टप्पेआतापर्यंत कर्मचा-यांना १२ वर्षांच्या सेवेनंतर पहिली आणि २४ वर्षांच्या सेवेनंतर दुसरी अशा दोन कालबद्ध पदोन्नती मिळायच्या. आता १०, २० आणि ३० वर्षांच्या सेवेनंतर एकेक अशा तीन कालबद्ध पदोन्नती मिळतील.

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी