तीन बहिणी तलावात बुडाल्या

By Admin | Updated: November 14, 2015 03:41 IST2015-11-14T03:41:14+5:302015-11-14T03:41:14+5:30

मुसळवाडी तलावानजीक शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या तीन बहिणींना जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली़ दुघर्टनेत दोघे जण बचावले़

Three sisters drown in the lake | तीन बहिणी तलावात बुडाल्या

तीन बहिणी तलावात बुडाल्या

राहुरी (अहमदनगर) : मुसळवाडी तलावानजीक शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या तीन बहिणींना जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली़ दुघर्टनेत दोघे जण बचावले़
मुसळवाडी तलावाजवळ राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या बर्डे कुटुंबातील सोनाली (८) व सुनीता (४) या सख्ख्या बहिणींसह चुलत बहीण सोनालिका (८), महेश, अक्षदा ही पाच भावंडे शेळ्या चारण्यासाठी गेली होती़ तलावाच्या पाण्यात अक्षदा अंघोळ करीत असताना सुनीता पाय घसरून पाण्यात पडली़ सुनीता पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली़ तिला वाचविण्यासाठी सोनाली व सोनालिका या दोघींनीही पाण्यात उडी घेतली़ मात्र, त्यांना पोहता येत नसल्यामुळे सोनाली व सुनीता या सख्ख्या बहिणींसह चुलत बहीण सोनालिका यांना जलसमाधी मिळाली़
सुनीताचा भाऊ महेश व अक्षदा यांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली़ अरुण पवार, अक्षय बर्डे, सागर जाधव यांनी तलावात उड्या घेऊन तिघी बहिणींना पाण्याबाहेर काढले़ तिघींनाही दुचाकीवरून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़
मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ सुधीर क्षीरसागर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Three sisters drown in the lake