वेश्या मारहाणप्रकरणी तीन पोलीस निलंबित

By Admin | Updated: September 7, 2015 00:44 IST2015-09-07T00:44:58+5:302015-09-07T00:44:58+5:30

येथील बाजारपेठेत वेश्यांंना मारहाण करणाऱ्या तीन पोलिसांना आयुक्त एस. रवी यांनी शनिवारी निलंबित केले. या कारवाईवेळी एक एएसआय

Three policemen suspended for harassment | वेश्या मारहाणप्रकरणी तीन पोलीस निलंबित

वेश्या मारहाणप्रकरणी तीन पोलीस निलंबित

बेळगाव : येथील बाजारपेठेत वेश्यांंना मारहाण करणाऱ्या तीन पोलिसांना आयुक्त एस. रवी यांनी शनिवारी निलंबित केले. या कारवाईवेळी एक एएसआय आणि महिला पोलीसही सहभागी झाली होती. त्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त एस. रवी यांनी सांगितले.बाजारपेठेतील गणपत गल्ली, रविवार पेठ आणि मारुती गल्ली परिसरात शुक्रवारी अश्लील हावभाव करीत वेश्या थांबल्या होत्या. बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांनी याबाबत खडेबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.(प्रतिनिधी)

Web Title: Three policemen suspended for harassment