वर्धा जिल्ह्यात वीज कोसळून तीन जण ठार
By Admin | Updated: June 27, 2016 18:56 IST2016-06-27T18:56:11+5:302016-06-27T18:56:11+5:30
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या सावलापुर शेत शिवारात शेतात लागवड करीत असलेल्या सहा मुलींवर विज कोसळल्याने दोन मूलींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

वर्धा जिल्ह्यात वीज कोसळून तीन जण ठार
ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. २७ - वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या सावलापुर शेत शिवारात शेतात लागवड करीत असलेल्या सहा मुलींवर विज कोसळल्याने दोन मूलींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर तिन मुलींची स्थिती गंभीर असून त्यांनी आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या लहादेवी येथील मजूर असून मृतक मध्ये जयश्री धुर्वे (17) अनिकेत परतेकी (11)आहेत तर जखमीत रोशनी सुडाम्(19) अदिति आत्राम (13) आँचल आत्राम (12) नशीब बलवतर असल्याने सोनाली इरपाते थोडक्यात बचावली आहे.