मालेगावजवळ कार अपघातात ३ जण जागीच ठार
By Admin | Updated: May 29, 2016 12:30 IST2016-05-29T12:30:29+5:302016-05-29T12:30:29+5:30
मालेगावजवळील संवदगाव शिवारात झालेल्या भीषण अपघातात ३ जाणांचा मृत्यू झाला आहे. धुळ्याला जाणारी कार अज्ञात वाहणाला धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे, या अपघातात ३ जण जागीच ठार

मालेगावजवळ कार अपघातात ३ जण जागीच ठार
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २९ : मुंबई-आग्रा माहामार्गावर मालेगावजवळील संवदगाव शिवारात झालेल्या भीषण अपघातात ३ जाणांचा मृत्यू झाला आहे. धुळ्याला जाणारी कार अज्ञात वाहणाला धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे, या अपघातात ३ जण जागीच ठार झाले तर २ गंभार जखमी झाले. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
धुळे-आग्रा रस्त्यावर कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रेखा रमेश पाटील (30, चिंचोली ता. यावल), प्रभाकर नथु साळुंखे (35, विदवाडे, ता. चोपड़ा) आणि नयन अशोक गाड़े (26, नगर) हे तिघे जागीच ठार आहेत.