सोनलपाडा धरणात तिघे बुडाले; दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: July 8, 2017 03:57 IST2017-07-08T03:57:51+5:302017-07-08T03:57:51+5:30

कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरणात शुक्र वारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास तिघे बुडाल्याची घटना घडली. त्यापैकी दोघांचे मृतदेह

Three people in Sonepada damaged; Death of both | सोनलपाडा धरणात तिघे बुडाले; दोघांचा मृत्यू

सोनलपाडा धरणात तिघे बुडाले; दोघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरणात शुक्र वारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास तिघे बुडाल्याची घटना घडली. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले, तर तिसऱ्याचा शोध पोलिसांसह ग्रामस्थ घेत आहेत.
कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरणावर वर्षासहलीसाठी पर्यटकांची शुक्र वारी गर्दी होती. दुपारी ४च्या सुमारास प्रवीण राणे (२४, रा. पोशीर), दिलीप खंडागळे (३५, रा. कशेळे), सचिन कानडे (कल्याण-शिवशक्ती नगर, नितवली) हे तिघे पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने धरणाच्या खोल भागात बुडाले. आजूबाजूच्या पर्यटकांना ही मुले धरणातील खोल भागात बुडत असल्याचे समजले. हे समजल्यानंतर येथील गावकऱ्यांनी ताबडतोब त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. स्थानिक ग्रामस्थांनी त्यातील प्रवीण, दिलीप यांचे मृतदेह बाहेर काढले, तर सचिनचा मृतदेह अद्याप सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Three people in Sonepada damaged; Death of both