हत्यारांसह तीन जण अटकेत, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

By Admin | Updated: March 23, 2017 03:13 IST2017-03-23T03:13:40+5:302017-03-23T03:13:40+5:30

रिक्षा चालकाला तलावारीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना बुधवारी पहाटे शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली

Three people including the killers and the accused, Shivajinagar police action | हत्यारांसह तीन जण अटकेत, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

हत्यारांसह तीन जण अटकेत, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

मुंबई : रिक्षा चालकाला तलावारीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना बुधवारी पहाटे शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी एक तलवार ताब्यात घेतली असून, यामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
इलियास शेख हा रिक्षा चालक बैंगणवाडी परिसरात जात असताना, त्याला दुचाकीवरून आलेल्या तीन इसमांनी रस्त्यात अडवले. त्यानंतर, तलवारीचा धाक दाखवत त्याच्याकडील दीड हजारांची रोख रक्कमदेखील काढून घेतली, तसेच त्याला मारहाणदेखील केली. याच दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे काही अधिकारी परिसरात गस्त घालत होते. पोलिसांना पाहताच इलियासने आरडाओरडा केला. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली असता, आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत, नबी शहा (२८), अब्दुल खान (३०) आणि शहजाद सय्यद (२०) या तीन आरोपींना अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Three people including the killers and the accused, Shivajinagar police action