विनयभंगप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

By Admin | Updated: January 19, 2017 06:06 IST2017-01-19T06:06:36+5:302017-01-19T06:06:36+5:30

गोरेगाव येथे लिफ्टमध्ये एका विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तीनजणांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे

Three people guilty of molestation | विनयभंगप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

विनयभंगप्रकरणी तीन जणांवर गुन्हा


मुंबई : गोरेगाव येथे लिफ्टमध्ये एका विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तीनजणांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. येथील प्रेमनगर परिसरात एसआरएची इमारत आहे. याच इमारतीत पीडित मुलगी आणि तीन आरोपी राहतात. मुलीने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून तीनजण या मुलीचा पाठलाग करत होते. तसेच तिची छेडछाडदेखील सुरू होती. सोमवारी ही मुलगी इमारतीच्या लिफ्टने घरी येत असताना तिला एकटी पाहून आरोपी लिफ्टमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी लिफ्टमध्ये तिचा विनयभंग केला. नंतर घडलेला सर्व प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितला. त्यानुसार तिच्या घरच्यांनी याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
केली. (प्रतिनिधी)

Web Title: Three people guilty of molestation