शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

समुद्रस्नान जिवावर बेतलं, ओमानमध्ये समुद्रात सांगली जिल्ह्यातील जतचे तिघे बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 13:01 IST

अचानक एक माेठी लाट आल्याने शशिकांत म्हमाणे, त्यांची मुलगी श्रुती व मुलगा श्रेयस हे तिघेही समुद्रात बेपत्ता झाले.

जत : कामानिमित्त दुबई येथे स्थायिक झालेले तिघे बाप-लेक ओमान येथे पर्यटनासाठी गेल्यानंतर समुद्रात बेपत्ता झाले आहेत. ही घटना रविवारी घडली. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा शाेध लागलेला नाही. शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षांची मुलगी श्रुती व सहा वर्षांचा मुलगा श्रेयस अशी बेपत्ता झालेल्या तिघांची नावे आहेत. या घटनेला जत येथील त्यांचे बंधू वकील राजकुमार म्हमाणे यांनी दुजोरा दिला आहे.शशिकांत म्हमाणे दुबई येथील बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये यांत्रिकी अभियंता आहेत. अनेक वर्षे ते संयुक्त अरब अमिरातीमधील विविध कंपन्यांमध्ये अभियंता पदावर कार्यरत आहेत. यामुळे कुटुंबासह ते दुबईमध्येच स्थायिक झाले आहेत. रविवारी ईदच्या सुटीनिमित्त ते पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती व अन्य काही मित्रांसोबत पर्यटनासाठी दुबईपासून जवळच असलेल्या ओमान येथील समुद्र किनाऱ्यावर गेले होते.अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणामध्ये सहलीसाठी निघाल्याचा एक व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. ओमान येथील सलालाह समुद्रकिनारी प्रचंड लाटा उसळत असताना त्याठिकाणी हे सर्वजण समुद्रस्नानाचा आनंद घेत हाेते. अचानक एक माेठी लाट आल्याने शशिकांत म्हमाणे, त्यांची मुलगी श्रुती व मुलगा श्रेयस हे तिघेही समुद्रात बेपत्ता झाले.या दुर्घटनेचा एक व्हिडिओही सध्या साेशल मीडियावर दिसत आहे. बेपत्ता व्यक्तींचा शाेध सुरू असल्याचे ओमानच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. म्हमाणे कुटुंबातील वडील, मुलगा आणि मुलगी बेपत्ता झाल्याचे वृत्त समजताच जतमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीtourismपर्यटनDubaiदुबई