बुलडाण्यात ट्रक आणि कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: December 30, 2016 12:27 IST2016-12-30T11:37:03+5:302016-12-30T12:27:37+5:30
बुलडाणामध्ये ट्रक आणि कारची धडकेत झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.

बुलडाण्यात ट्रक आणि कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 30 - ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सिंदखेड राजाजवळची ही घटना आहे. शुक्रवारी सकाळी ही दुर्घटना घडली आहे.
मृतांमध्ये एक 12 वर्षांचा मुलगा, 16 वर्षांची मुलगी आणि चालकाचा समावेश आहे. तर जखमी महिलांना जालना येथील हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
सिंदखेड राजा येथील मोती तलावाच्या वळणावर कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला तर ट्रक पूर्णपणे उलटला. यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.