बसची तीन प्रवाशांना धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2017 03:33 IST2017-02-15T03:33:20+5:302017-02-15T03:33:20+5:30
भरधाव वेगात असलेल्या बेस्टने बसथांब्यावर उभ्या असलेल्या तीन प्रवाशांना धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री चेंबूरच्या आरसीएफ

बसची तीन प्रवाशांना धडक
मुंबई : भरधाव वेगात असलेल्या बेस्टने बसथांब्यावर उभ्या असलेल्या तीन प्रवाशांना धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री चेंबूरच्या आरसीएफ परिसरात घडली. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, आरसीएफ पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करत बेस्ट चालकाला अटक केली आहे.
चेंबूरच्या गव्हाणपाडा परिसरातील इंडियन आॅइल नगर बस स्थानकावर ही घटना घडली. माहुल-कुर्ला ही बस भरधाव वेगात या ठिकाणी आली. या ठिकाणी उभे असलेले प्रवासी मारुती श्रीसागर, मनोज इंदर, हरेश सिरसाट हे तिघेही जखमी झाले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच यातील श्रीसागर यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)