उमेदवाराच्या दारू पार्टीमुळे तिघांचा मृत्यू

By Admin | Updated: February 14, 2017 13:51 IST2017-02-14T13:47:05+5:302017-02-14T13:51:21+5:30

अहमदनगरमध्ये एका उमेदवाराने दिलेल्या दारू पार्टीत विषबाधा झाल्याने तीन जणांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.

Three party killed due to liquor party of candidate | उमेदवाराच्या दारू पार्टीमुळे तिघांचा मृत्यू

उमेदवाराच्या दारू पार्टीमुळे तिघांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. 14 - निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांसहीत कार्यकर्त्यांना प्रलोभन दिले जात असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. नगरमध्येही एका उमेदवाराने दिलेल्या दारू पार्टीत विषबाधा झाल्याने तीन जणांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. पंगरमल येथे पंचायत समितीच्या उमेदवाराने दिलेल्या पार्टीत दारुचे अति सेवन केल्याने तीन कार्यकर्तांचा मृत्यू झाला आहे. तर सातजण अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. 
 
 
दरम्यान, हा उमेदवार शिवसेना पक्षाचा असून त्याचे नाव मंगल आव्हाड असल्याची माहिती समोर येत आहे. उमेदवार आव्हाडने कार्यकर्त्यांना दारूची पार्टी दिली. यात दारूचे अति प्रमाणात सेवन केल्यानं तिघांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.  
 

Web Title: Three party killed due to liquor party of candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.