तीन अधिकारी निलंबित

By Admin | Updated: November 5, 2016 04:27 IST2016-11-05T04:27:24+5:302016-11-05T04:27:24+5:30

पूल कोसळल्याप्रकरणी उपविभागीय अभियंता एम. जी. काडलीकर, शाखा अभियंता बी. एस. शेजूळ, शाखा अभियंता एस. एल. देवरे यांना अव्वर सचिव कैलास बधान यांनी निलंबित केले.

Three officers suspended | तीन अधिकारी निलंबित

तीन अधिकारी निलंबित


औरंगाबाद : सिल्लोड - कन्नड रस्त्यावरील ४० वर्षे जुना पूल कोसळल्याप्रकरणी उपविभागीय अभियंता एम. जी. काडलीकर, शाखा अभियंता बी. एस. शेजूळ, शाखा अभियंता एस. एल. देवरे यांना अव्वर सचिव कैलास बधान यांनी निलंबित केले.
सप्टेंबर महिन्यात हा पूल कोसळून चार जण जखमी झाले होते. त्याची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांसह त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित केली होती. समितीने शासनाला अहवाल दिला होता. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Three officers suspended