मारहाण व शिवीगाळप्रकरणी तिघांना तीन महिने सक्तमजुरी

By Admin | Updated: August 17, 2016 20:28 IST2016-08-17T20:28:01+5:302016-08-17T20:28:01+5:30

क्षुल्लक कारणावरून मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने तिघांना तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

Three months of harassment and abduction for three months | मारहाण व शिवीगाळप्रकरणी तिघांना तीन महिने सक्तमजुरी

मारहाण व शिवीगाळप्रकरणी तिघांना तीन महिने सक्तमजुरी

ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर (वाशिम), दि. 17 - क्षुल्लक कारणावरून मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने तिघांना तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
अधिक माहितीनुसार फिर्यादी सुमेध नाथा पट्टेबहादूर (रा. तऱ्हाळा) यांनी मंगरुळपीर पोलिसांत १६ आॅगस्ट रोजी तक्रार दिली होती. आरोपी आकाश खंंडारे (रा.तऱ्हाळा)  हा फिर्यादीच्या घरासमोर मोबाईलवर गाणे वाजवत होता. फिर्यादीने मनाई केली असता आकाश खंडारे, जनार्धन खंडारे व प्रकाश खंडारे यांनी मारहाण व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला. यानंतर हे .काँ.सुभाष महाजन यांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. १६ आॅगस्ट रोजी प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्ययदंडाधिकारी रोकडे यांनी आरोपीस तीन महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. एम. जी. शर्मा यांनी तर पैशा पैरवी म्हणून हे काँ. अरुण राऊत व पो. काँ. गजानन यांनी काम पाहिले.

Web Title: Three months of harassment and abduction for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.