महामार्गांवरील दोन अपघातांत तीन ठार

By Admin | Updated: June 27, 2016 05:02 IST2016-06-27T05:02:34+5:302016-06-27T05:02:34+5:30

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी सकाळी दोन भीषण अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जखमी झाले.

Three killed in two accidents on highways | महामार्गांवरील दोन अपघातांत तीन ठार

महामार्गांवरील दोन अपघातांत तीन ठार


अहमदनगर/पुणे : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी सकाळी दोन भीषण अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जखमी झाले.
नाशिक-पुणे महामार्गावरील माहुली शिवारात ट्रक व दुचाकीची धडक झाली. राम यादव (४४) व मोहंमद शबूअली (दोघे मूळ बिहार, हल्ली रा. अंबड, नाशिक) या दोघांचा मृत्यू झाला. ते दुचाकीने आळेफाट्याहून संगमनेरकडे जात होते. पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. दोघेही जागीच ठार झाले. यादव बांधकाम ठेकेदार, तर शबूअली मजूर होता.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ओझर्डे गावाजवळ ट्रकला भरधाव कारची धडक बसून कारचालक ठार, तर तीन जखमी झाले. अक्षय गोळे (२२, चिखली) असे अपघातातील मृताचे नाव आहे. कारमधील ओम्कार मच्छिंद्र (२१), योगेश डावरे (२१), हर्षद शिंदे (२२, चाकण) जखमी झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Three killed in two accidents on highways