ट्रकच्या धडकेत तीन ठार

By Admin | Updated: June 9, 2017 04:53 IST2017-06-09T04:53:30+5:302017-06-09T04:53:30+5:30

बल्लारपूर-सास्ती मार्गावर बुधवारी रात्री ८च्या सुमारास एका वळणावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिघे ठार झाले.

Three killed in truck crash | ट्रकच्या धडकेत तीन ठार

ट्रकच्या धडकेत तीन ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर (चंद्रपूर) : बल्लारपूर-सास्ती मार्गावर बुधवारी रात्री ८च्या सुमारास एका वळणावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिघे ठार झाले. ते राजुरा तालुक्यातील रामनगर (सास्ती) येथील मित्राच्या घरून परतत असताना हा अपघात झाला.
अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालक मनोज मोहनलाल केशकर याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली.
लक्ष्मण विठोबा आभारे (३३), भास्कर सुरेश गिरडकर आणि श्रीनिवास कलवल (२७) अशी मृतांची नावे आहेत. ते एकाच ठिकाणी कंत्राटदाराकडे कामाला होते. विसापूर येथून भास्कर गिरडकर याच्या दुचाकीने ते तिघेही सास्तीला गेले. तेथे जेवण करून परतत असताना हा अपघात झाला.
>तणावाचे वातावरण
मृतांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नेत्यांनी केली. त्यामुळे बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात व पोलीस ठाण्यात गुरुवारी तणावाचे वातावरण होते. चार तासांच्या वाटाघाटीनंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.

Web Title: Three killed in truck crash