द्रुतगती मार्गावर तिघे ठार

By Admin | Updated: August 11, 2014 03:36 IST2014-08-11T03:36:44+5:302014-08-11T03:36:44+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव मोटार एका कंटेनरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर सात जण जखमी झाले

Three killed in a speeding road | द्रुतगती मार्गावर तिघे ठार

द्रुतगती मार्गावर तिघे ठार

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव मोटार एका कंटेनरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर सात जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात रविवारी दुपारी एकच्या सुमारास मळवली येथील बोरजच्या हद्दीत झाला.
तेजल सुहास जगताप (२३, रा. रामनगर, येरवडा, पुणे), लक्ष्मी नारायण चौगुले (४५) व यतिन नारायण चौगुले (२४, दोघेही रा. ठाणे) अशी या मृतांची नावे आहेत. राधा रामदास नारके (रा़ मुंबई), संतोष सुदाम भेगडे (रा़ मुंबई), नाथा तुकाराम नरे (रा़ ठाणे), करण बापूराव जाधव (रा़ सानपाडा), सुहास शिवाजी जगताप (रा़ पुणे), मयूर मधुकर वाघमारे (रा़ मुंबई) यासह मोटारीचा चालक विक्रांत छगन गायकवाड (रा़ पुणे) जखमी झाले आहेत़ यापैकी नरे व जगताप यांची प्रकृती चिंताजनक आहे़ मुंबईतील ३ तर सानपाडा, ठाणे येथील ६ प्रवासी घेऊन विक्रांत मुंबईहून पुण्याकडे येत होता. द्रुतगती महामार्गावरील बोरज गावाजवळ टायर फुटल्याने एक कंटेनर उभा होता़ भरधाव वेगात असलेल्या विक्रांतला हा कंटेनर दिसला पण गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Three killed in a speeding road