रिक्षा-बस अपघातात 3 ठार

By Admin | Updated: January 31, 2015 05:08 IST2015-01-31T05:08:16+5:302015-01-31T05:08:16+5:30

एस.टी. बस व रिक्षा यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ३ जण ठार व ३५ जण जखमी झाले. मृतांमध्ये एक वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे.

Three killed in rickshaw-bus accident | रिक्षा-बस अपघातात 3 ठार

रिक्षा-बस अपघातात 3 ठार

पारोळा (जि. जळगाव) : एस.टी. बस व रिक्षा यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ३ जण ठार व ३५ जण जखमी झाले. मृतांमध्ये एक वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे.
अपघातानंतर बस चारीत उलटली. जखमींपैकी ८ जण गंभीर आहेत. रिक्षातील संतोष मांगो राठोड (४५, रा. आडगाव), प्रमिलाबाई संदीप पाटील (२१, रा. पाळधी) हे जागीच ठार झाले तर नरेंद्रसिंग भीमसिंग राजपूत (१ वर्ष, रा. पाळधी) याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
अमळनेर आगाराची बस पारोळ्याहून भडगावकडे जात होती. त्याचवेळी विनाक्रमांकाची प्रवासी रिक्षा आडगावकडून पारोळ्याकडे येत होती. रिक्षाचालक कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न करीत असतानाच रिक्षा-बसमध्ये धडक झाली. रिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला असता ती चारीत जाऊन उलटली. अपघातात बसमधील काही प्रवाशांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले. काही जखमींना खासगी तर सुमारे २२ जणांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Three killed in rickshaw-bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.