दरोडेखोरांच्या हल्ल्यात परभणीत तीन ठार

By Admin | Updated: February 4, 2016 04:25 IST2016-02-04T04:25:48+5:302016-02-04T04:25:48+5:30

ताडबोरगाव शिवारात मंगळवारी रात्री दरोडेखोरांनी दोन आखाड्यांवर धुमाकूळ घातला. तिघांचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला, तर अन्य दोघांना गंभीर जखमी केले.

Three killed in Parbhani attack | दरोडेखोरांच्या हल्ल्यात परभणीत तीन ठार

दरोडेखोरांच्या हल्ल्यात परभणीत तीन ठार

मानवत (जि. परभणी) : ताडबोरगाव शिवारात मंगळवारी रात्री दरोडेखोरांनी दोन आखाड्यांवर धुमाकूळ घातला. तिघांचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला, तर अन्य दोघांना गंभीर जखमी केले. जखमींवर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सुभाष गिण्यानदेव पठाडे (५२), शांताबाई सुभाष पठाडे (४८, दोघे रा. ताडबोरगाव) आणि सूर्यभान राजाराम फुलपगारे (६० रा.मोरेगाव ता.सेलू) अशी मृतांची नावे आहेत. परभणी-पाथरी रस्त्यावर सुभाष पठाडे यांचे शेत आहे. पठाडे हे पत्नी शांताबाईसह सध्या शेतातील आखाड्यावर राहत होते. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी सुभाष आणि शांताबाई यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांचा खून केला. त्यानंतर कुमार गुंगाणे यांच्या शेताकडे मोर्चा वळविला. गुंगाणे यांच्या शेतामध्ये सूर्यभान राजाराम फुलपगारे हे कुटुंबीयांसह झोपले होते. दरोडेखोरांनी सूर्यभान फुलपगारे, त्यांच्या पत्नी पार्वतीबाई (५५), मुलगा भाऊराव (३५), नातू दीपक (१०) व सुनिता (८) यांना मारहाण केली. सूर्यभान यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Three killed in Parbhani attack