नाशिकजवळ झालेल्या अपघातात तीन ठार
By Admin | Updated: November 14, 2016 14:32 IST2016-11-14T14:32:27+5:302016-11-14T14:32:27+5:30
मुंबई नाशिक महामार्गावर एर्टिका व ट्रकच्या झालेल्या अपघातात कल्याण व उल्हासनगर येथील तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

नाशिकजवळ झालेल्या अपघातात तीन ठार
> ऑनलाईन लोकमत
नाशिक, दि. 14 - मुंबई नाशिक महामार्गावरील विल्होळी आठवा मैल शिवारातील जीत ढाब्यासमोर एर्टिका व ट्रकच्या झालेल्या अपघातात कल्याण व उल्हासनगर येथील तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
वाडीवऱ्हे पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या एर्टिका क्रमांक एमएच - 05, बीसी - 4873 या वाहनाने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एमएच - 18, एम- 9793 ला मागून जोरात धडक दिल्याने एर्टिका वाहनातील मुकेश नोटन चौधरी (34) राहणार कल्याण तर मानसी चतुर चौधरी (13) कल्याण, भाऊसाहेब आनंदा गांगुर्डे (45) उल्हासनगर हे ठार झाले. तर जयवंत रामदास पाबळे, अंकित चतुर चौधरी वय(8) राहणार कल्याण व उल्हासनगर हे जखमी झाले. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाईक करीत आहे.