नाशिकममध्ये बस - कारच्या अपघातात तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: June 15, 2015 11:05 IST2015-06-15T11:05:43+5:302015-06-15T11:05:43+5:30
नाशिक ओझर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या बसने कारला धडक दिल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.

नाशिकममध्ये बस - कारच्या अपघातात तिघांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १५ - नाशिक ओझर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या बसने कारला धडक दिल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या अपघातात तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून सुमारे १५ जण या अपघातात जखमी झाले आहे.
पहाटे साडे तीनच्या सुमारास नाशिक ओझर महामार्गावर बसने विंगर गाडीला धडक दिली. या अपघातात मृत्यू झालेले तिघे जण मालेगावचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये अपघातांची मालिका सुरु असून रविवारीही पुणे व पालघरमध्येही अपघात झाले होते.