कुडनकुलममध्ये अपघात: तीन जण जखमी

By Admin | Updated: May 14, 2014 15:23 IST2014-05-14T15:09:19+5:302014-05-14T15:23:06+5:30

तामिळनाडू येथे होवू घातलेला आणि तितकाच वादग्रस्त ठरलेला कुडनकुलममध्ये पुन्हा एकदा अपघात झाला.

Three injured in Kudankulam accident | कुडनकुलममध्ये अपघात: तीन जण जखमी

कुडनकुलममध्ये अपघात: तीन जण जखमी

>ऑनलाइन टीम 
कुडनकुलम, दि. १४ - तामिळनाडू येथे होवू घातलेला आणि तितकाच वादग्रस्त ठरलेला कुडनकुलममध्ये पुन्हा एकदा अपघात झाला. बुधवारी कुडनकुलममधील पाईपलाइनमधील गरम पाण्याला गळती लागल्याने यामध्ये तीन जण गंभीर भाजून जखमी झाले. या अपघातातील जखमींची नावे अद्याप समजू शकली नाही. 
तामिळनाडूमधील बहुचर्चीत कुडनकुलम न्यूक्लीअर पॉवर प्लान्ट होत आहे. या प्लान्टला स्थानिक रहिवाशांनी मोठा विरोध दर्शवला होता. हा प्लान्ट झाल्यास याचा येथील वातावरणावर परिणाम होईल त्यामुळे हा प्लान्ट होवू नये यासाठी अनेकांनी विरोध दर्शवला आहे. याआधीही या ठिकाणी अनेक अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

Web Title: Three injured in Kudankulam accident