ट्रकसह तीनशे गॅस सिलिंडर खाक
By Admin | Updated: November 25, 2014 01:58 IST2014-11-25T01:58:06+5:302014-11-25T01:58:06+5:30
अलिबाग येथून मुरबाड येथील अंजली गॅस एजन्सीचे तीनशे सिलिंडर घेऊन जात असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग लागून तो सिलिंडरसह खाक झाला.

ट्रकसह तीनशे गॅस सिलिंडर खाक
म्हसा/मुरबाड : अलिबाग येथून मुरबाड येथील अंजली गॅस एजन्सीचे तीनशे सिलिंडर घेऊन जात असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग लागून तो सिलिंडरसह खाक झाला. ही घटना बाटलीची वाडी, म्हसानजीक घडली. आधी आग ड्रायव्हरच्या केबिनमध्ये लागली.
ती विझविण्यासाठी चालक आणि वाहक पाणी आणण्यासाठी बादल्या घेऊन खाली उतरले असतानाच आग भडकली व सिलिंडरचे स्फोट होऊ लागले. आग इतकी भयानक होती की मुरबाड आणि आसपासच्या शहरातून अगिAशमन बंबांना बोलवावे लागले. ट्रकसह सर्व सिलिंडर खाक झाले. यातून चालक, क्लिनर बचावले. टाटा कंपनीचा हा ट्रक मुरबाडच्या अंजली गॅस एजन्सीच्या मालकीचा होता. अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती.