बँकांमध्ये भरल्या तीन लाखांच्या बनावट नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2017 16:55 IST2017-01-05T16:55:31+5:302017-01-05T16:55:31+5:30
अज्ञात संशयितांनी बनावट चलनी नोटा तयार करुन त्या खऱ्या असल्याचे भासवून शरणपूररोडवरील विविध राष्ट्रीयीकृत आणि खाजगी बँकांमध्ये सुमारे तीन लाख सात हजार

बँकांमध्ये भरल्या तीन लाखांच्या बनावट नोटा
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 5 - अज्ञात संशयितांनी बनावट चलनी नोटा तयार करुन त्या खऱ्या असल्याचे भासवून शरणपूररोडवरील विविध राष्ट्रीयीकृत आणि खाजगी बँकांमध्ये सुमारे तीन लाख सात हजार रुपयांच्या बनावट रकमेचा भरणा केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१५ पासून २०१६च्या डिसेंबरअखेरपर्यंत विविध बँकांमध्ये अज्ञात संशयितांनी बनावट नोटा भरल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी सर्व बँकांमध्ये जाऊन बनावट नोटा जप्त केल्या असून, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शरणपूररोडवरील आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, येस, कॉसमॉस या बँकांमध्ये बनावट नोटांचा भरणा केल्याचे उघडकीस आले आहे.