रिओ की तीन देवियां - शोभा डेंची कोलांटऊडी

By Admin | Updated: August 20, 2016 18:07 IST2016-08-20T17:41:46+5:302016-08-20T18:07:39+5:30

रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंवर टीकास्त्र सोडणा-या लेखिका शोभ डेंना चक्क उपरती झाली असून त्यांनी 'सिंधू, साक्षी व दीपाचे' कौतुक केले आहे.

Three goddesses of Rio - Shobha Danchi Collantudi | रिओ की तीन देवियां - शोभा डेंची कोलांटऊडी

रिओ की तीन देवियां - शोभा डेंची कोलांटऊडी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंवर टीका करत वादग्रस्त ट्विट करत वादात सापडलेल्या लेखिका शोभा डे यांनी आता चक्क भारतासाठी पदक जिंकणा-या 'सिंधू, साक्षी व दीपाचे' कौतुक करत समरसॉल्ट मारली आहे.  पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये रौप्य पदकावल्यानंतर ट्विटर व एका दैनिकातील लेखातून शोभा यांनी सिंधूसह इतर महिला खेळाडूंवर स्तुतीसुमने उधळली आहेत. 
 
आणखी वाचा :
(शोभा डे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात)
  •  
 
(सोशल मीडियावरुन शोभा डें वर टीकेचा भडीमार)
  •  
 
(आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं विनोद नाही - सचिनने शोभा डेंना सुनावले)
('शोभा डें'ना उत्तर देण्यासाठी अमिताभ काढणार सिंधूसोबत सेल्फी)
  •  
 
  •  
 'ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचं केवळ एकच लक्ष्य आहे. रियोला जा, सेल्फी काढा आणि खाली हात परत या. हा संधी आणि पैशांचा अपव्यय आहे' असे वादग्रस्त ट्विट केल्याने शोभा डे चांगल्याच अडचणीत सापडल्या. जनसामन्यांपासून ते अभिनव बिंद्रा, सेहवाग, अमिताभ, सचिन तेंडुलकर अशा दिग्गजांनी शोभा डे यांच्या वक्तव्याबाबत नाराजी दर्शवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. आपल्या या वक्तव्याची भरपाई करण्यासाठी डे यांनी सारवासारव करत लेखातून या महिला खेळाडूंचे कौतुक केले, मात्र त्यामध्ये त्या इतक्या वहावत गेल्या की कांस्यपदक विजेती साक्षी मलिकला थेट 'रौप्य' पदकाची मानकरी करून टाकले. 
आपल्या या लेखात शोभा यांनी सिंधू, साक्षी व दीपा यांची अथक मेहनत, श्रम यांचे कौतुक करतानाच त्या खेळाडूंचे प्रशिक्षक व पालकांनी केलेल्या त्यागाचाही उल्लेख करत त्यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला. तसेच या खेळाडूंवर होणा-या बक्षिसांच्या वर्षावाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध केल्यानंतर नव्हे तर ज्यावेळी त्यांना सर्वात अधिक गरज होती, तेव्हा त्यांना आर्थिक पाठबळ द्यायला हवे होते, असे सांगत सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच देशाने सध्या मिळालेल्या यशाने हुरळून न जाता टोकियोत २०२० साली होणा-या ऑलिम्पिकसाठी कसून तयारी करायला हवी, असा अनाहूत सल्लाही दिला. 
डे यांचा हा लेख व त्यांनी केलेले कौतुक  पाहता त्यांना आपल्या वक्तव्याची खरंच उपरती झाली की काय असा प्रश्न पडावा. मात्र यावेळी डे यांना एकच सांगावेसे वाटते ते म्हणजे 'बूंद से गयी वो हौद से नही आती..' 
पुढच्या वेळेस तरी एखादे वादग्रस्त वक्तव्य करण्यापूर्वी त्या दहा वेळा विचार करून बोलतील हीच अपेक्षा...!
 

Web Title: Three goddesses of Rio - Shobha Danchi Collantudi