वांगणीत डोहात बुडून तीन मुलींचा मृत्यू

By Admin | Updated: May 10, 2015 03:49 IST2015-05-10T03:49:02+5:302015-05-10T03:49:02+5:30

तालुक्यातील वांगणी पाटीलपाडा गावातील तीन मुलींचा लेंडी नदीवरील वझरा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

Three girls die drowning in a diving boat and killing three girls | वांगणीत डोहात बुडून तीन मुलींचा मृत्यू

वांगणीत डोहात बुडून तीन मुलींचा मृत्यू

जव्हार : तालुक्यातील वांगणी पाटीलपाडा गावातील तीन मुलींचा लेंडी नदीवरील वझरा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. यात कांचन अमृत घाटाळ (६), वर्षा लक्ष्मण चौधरी (६), भाविका रघुनाथ घाटाळ (५) यांचा समावेश आहे.
वांगणी, पाटीलपाडा, सावरीचाघरटा, निंबारपाडा अशा चार पाड्यांतील २० ते २५ लहान मुले-मुलीे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आंघोळीसाठी गेल्या होत्या. मात्र यातील तिघी सायंकाळी ६ नंतर घरी परतल्या नाहीत. त्यामुळे पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. जवळपास सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर पालकांना संशय आल्याने त्यांनी नदीकाठावर जाऊन बघितले असता तिघींचेही कपडे तिरावर होते. ग्रामस्थांनी डोहात शोध घेतला त्या वेळी त्या बुडाल्याचे लक्षात आले. याबाबत तहसीलदार तसेच पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिघींचेही मृतदेह बाहेर काढले. घटनेचा तपास जव्हार पोलीस करीत आहेत.

Web Title: Three girls die drowning in a diving boat and killing three girls