शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी; शिंदे गटाला झटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 06:33 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी मंगळवारी आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यात नवीन गवते, माजी नगरसेविका अपर्णा गवते, दीपा गवते, प्रभाग समितीचे माजी सदस्य दामोदर कोटियन, संतोष मुळे, चंद्रकांत सोनकांबळे आदींचा समावेश आहे.

शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक खैरणे येथील क्रिस्टल हाऊस कार्यालयात स्वगृही परतल्याची माहिती गणेश नाईक यांनी दिली. एक वर्षापूर्वी नवी मुंबईतील भाजपचे हे तिन्ही माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन नगरविकास व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री  एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले होते. पण आता राज्यात पुन्हा शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यामुळे त्यांनी घरवापसी केली.

घरे वाचविण्यासाठी 

- दिघा विभागातील अनधिकृत बांधकामांची येथील रहिवाशांवर टांगती तलवार आहे. 

- ८० ते ९० इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांची घरे तसेच नवी मुंबईत गरजेपोटी गावठाणाबाहेर बांधलेली सर्व घरे नियमित करावीत, अशी मागणी आहे. 

- गणेश नाईक यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच हा प्रश्न सोडवू शकतात, म्हणून आम्ही भाजपात प्रवेश केल्याची माहिती नवीन गवते यांनी दिली.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNavi Mumbaiनवी मुंबई