तीन शेतकऱ्यांच्या विदर्भात आत्महत्या
By Admin | Updated: September 11, 2016 04:03 IST2016-09-11T04:03:18+5:302016-09-11T04:03:18+5:30
नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

तीन शेतकऱ्यांच्या विदर्भात आत्महत्या
अमरावती / यवतमाळ / भंडारा : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.
अमरावती येथील नया अकोला गावात संदीप पांडुरंग कांडलकर (३३) या युवा शेतकऱ्याने शनिवारी दुपारी विषप्राशन करून आत्महत्या केली. संदीप याच्याकडे सहा एकर शेती होती. पिकांसाठी त्याने स्टेट बँकेकडून दीड लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र, यंदाही पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे पीक नष्ट झाले. पुन्हा कर्ज कोणाकडे मागायचे, या विवंचनेत त्याने विषप्राशन केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
यवतमाळ जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यातील महंमदपूर येथे प्रभाकर जगन्नाथ मुंडले (५०) यांनी शुक्रवारी विषप्राशन करून आत्महत्या केली. डोक्यावरील कर्ज फेडायचे कसे या चिंतेतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे अनिल रिनायत (३७) शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्ज फेडण्याच्या विंवचनेतून बुधवारी ओहोळात उडी घेऊन आत्महत्या केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)