मराठवाडय़ात तीन शेतक:यांची आत्महत्या
By Admin | Updated: November 30, 2014 01:28 IST2014-11-30T01:28:09+5:302014-11-30T01:28:09+5:30
सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून औरंगाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यातील 3 शेतक:यांनी आत्महत्या केली.

मराठवाडय़ात तीन शेतक:यांची आत्महत्या
औरंगाबाद : सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून औरंगाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यातील 3 शेतक:यांनी आत्महत्या केली.
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील गांजूरवाडी शिवारात संग्राम लक्ष्मण बेंबडे (46) यांनी स्वत:चे घर पेटवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली़ बेंबडे यांच्या कुटुंबास सात एकर शेती आह़े संग्राम यांनी काही महिन्यांपूर्वी तलावातील गाळ आणून शेतीत टाकला होता तसेच कूपनलिकाही घेतली होती़ त्यांना विजेचे बिल 7क् हजार रुपये आले होत़े काही दिवसांपासून ते चिंतित होत़े शिवाय त्यांच्यावर खासगी सावकाराचे कर्ज होते, असे नातेवाइकांनी सांगितल़े दुसरी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली. शुक्रवारी रात्री तळनेर (जि. औरंगाबाद) येथील भास्कर दगडुबा गोरे (45) या शेतक:याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्र संपविली. एक एकर जमिनीवरच त्यांचा संसाराचा गाडा सुरू होता. मात्र यंदा दुष्काळामुळे शेतात नापिकी झाल्याने पिकावर झालेला खर्चही निघाला नाही. त्यातच मुलगी लग्नाला आल्याने ते धास्तावले होते. डोक्यावर असलेले सोसायटीचे 15 हजारांचे आणि खासगी 5क् हजारांचे कर्ज कसे फिटणार? ही काळजी त्यांना होती. तिसरी घटना लातूर जिल्ह्यात घडली. खाजगी फायनान्सचे कर्ज आणि सततच्या नापिकीने त्रस्त झालेल्या परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथील अनिल उत्तमराव गिरी (36) यांनी गळफास घेऊन जीवनयात्र संपविली. ही घटना 29 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर 2 वाजण्याच्या सुमारास घडली. (प्रतिनिधी)