तीन अभियंत्यांची वेतनवाढ रोखली

By Admin | Updated: September 5, 2016 04:18 IST2016-09-05T04:18:08+5:302016-09-05T04:18:08+5:30

मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातुरात पाणी वाया घालवल्याचा फटका तीन अभियंत्यांना बसला.

The three engineers stopped the salary increase | तीन अभियंत्यांची वेतनवाढ रोखली

तीन अभियंत्यांची वेतनवाढ रोखली

लातूर : मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातुरात पाणी वाया घालवल्याचा फटका तीन अभियंत्यांना बसला. बार्शी रोडवरील टाकी भरल्यानंतर पाणीपुरवठा वेळीच बंद न केल्याने, लाखो लीटर पाणी वाहून गेल्याप्रकरणी या तिघांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.
शाखा अभियंता श्रीमती यू. एच. शिंदे, बी. डी. बिराजदार आणि डी. जी. यादव या तीन अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी घेतला. आयुक्तपदाचा पदभार असताना, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयालगत बार्शी रोडवर असलेल्या जलकुंभात हरंगुळ व साई येथील जलशुद्धिकरण केंद्राच्या पंपांवरून मोठ्या दाबाने पाणी घेऊन लातूरकरांची तहान भागविली जाते. २१ आॅगस्ट रोजी पाणीपुरवठा सुरू नसताना हे दोन्ही पंप सुरू होते. त्यामुळे जलकुंभ भरल्यानंतर लाखो लीटर पाणी वाया गेले आणि त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. अर्ध्या तासानंतर हे पंप बंद करण्यात आले.
आर्वी जलकुंभास पाणी घेण्याची जबाबदारी शाखा अभियंता यू. एच. शिंदे यांच्याकडे, तर हरंगुळ जलशुद्धिकरण केंद्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम बी. डी. बिराजदार यांच्याकडे आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. जी. यादव आहेत. (प्रतिनिधी)
>लातूर : मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातुरात पाणी वाया घालवल्याचा फटका तीन अभियंत्यांना बसला. बार्शी रोडवरील टाकी भरल्यानंतर पाणीपुरवठा वेळीच बंद न केल्याने, लाखो लीटर पाणी वाहून गेल्याप्रकरणी या तिघांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.
शाखा अभियंता श्रीमती यू. एच. शिंदे, बी. डी. बिराजदार आणि डी. जी. यादव या तीन अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी घेतला. आयुक्तपदाचा पदभार असताना, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयालगत बार्शी रोडवर असलेल्या जलकुंभात हरंगुळ व साई येथील जलशुद्धिकरण केंद्राच्या पंपांवरून मोठ्या दाबाने पाणी घेऊन लातूरकरांची तहान भागविली जाते. २१ आॅगस्ट रोजी पाणीपुरवठा सुरू नसताना हे दोन्ही पंप सुरू होते. त्यामुळे जलकुंभ भरल्यानंतर लाखो लीटर पाणी वाया गेले आणि त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. अर्ध्या तासानंतर हे पंप बंद करण्यात आले.
आर्वी जलकुंभास पाणी घेण्याची जबाबदारी शाखा अभियंता यू. एच. शिंदे यांच्याकडे, तर हरंगुळ जलशुद्धिकरण केंद्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम बी. डी. बिराजदार यांच्याकडे आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. जी. यादव आहेत. (प्रतिनिधी)तथापि, यादव यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याने, जिल्हाधिकारी पोले यांनी गेल्या आठवड्यात यादव, शिंदे आणि बिराजदार यांची एक वार्षिक वेतनवाढ रोखली.

Web Title: The three engineers stopped the salary increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.