वान नदीच्या डोहामध्ये बुडून तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: August 17, 2016 02:36 IST2016-08-17T02:36:28+5:302016-08-17T02:36:28+5:30
अकोला जिल्ह्यात एकूण पाच जण बुडून मृत्यूमुखी पडले.

वान नदीच्या डोहामध्ये बुडून तिघांचा मृत्यू
हिवरखेड(जि. अकोला), दि. १६ : वारी येथील डोहामध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान घडली.
वारी येथील जामुठी डोहामध्ये शे. शाकीर शे. अबू कुरेशी (२२) बेलखेड, शे. नाजीम शे. रशीद (२२) बावनबीर, शे. नदीम शे. हारून (२२) बेलखेड हे तिघेजण पोहण्यासाठी गेले असता, या डोहामध्ये बुडाले व त्यांचा मृत्यू झाला.
१५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताचे सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती पोलीस पाटील रंगुलाल कासोटे यांनी हिवरखेड पोलिसांना दिली. यावेळी हिवरखेडचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे, सोनाळा ठाणेदार एस. पी. परदेशी, पीएसआय सुनील बडगुजर, एएसआय भगवान पाटील, पोकाँ. सुगंधी, कांबळे, पो. पा. कासोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच हिवरखेडसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मृतक युवकांचे मृतदेह बाहेर काढून तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर बेलखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. या प्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यृची नोंद करण्यात आली.
सूर्या धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू
सातपुड्यातील सूर्या धबधब्यावर आंघोळ करत असतांना अकोला येथील रमेश बळीराम करंगाळे (३४) याचा १५ ऑगस्ट रोजी बुडून मृत्यू झाला.
कृषि नगर परिसरात विहिरीत बुडून मृत्यू
कृषिनगर परिसरात असलेल्या इंदिरानगर येथील रहिवासी इसम वाहनातील ट्यूबच्या साहाय्याने विहिरीत आंघोळ करीत असताना ट्यूबमधील हवा गेल्याने इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. चिंतामन सावळे, असे इसमाचे नाव आहे.