हरभ-याच्या ढिगाखाली दबून तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: November 10, 2014 01:41 IST2014-11-10T01:30:38+5:302014-11-10T01:41:20+5:30
वाशिमच्या विठ्ठल डाळ मिलमधील धक्कादायक घटना, मृतांमध्ये दोघे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी.

हरभ-याच्या ढिगाखाली दबून तिघांचा मृत्यू
वाशिम: येथील एका दालमिलमध्ये डाळ बनविणारी चाडी अचानक अंगावर कोसळल्याने, शेकडो क्विंटल हरभर्याच्या ढिगाखाली दबून तीन मजुरांचा रविवारी मृत्यू झाला.
दुर्घटनेत पंचाळा येथील बालाजी पांडुरंग मोरे, अमरावतीमधील धारणी तालुक्यातील गौलखेड येथील जयशंकर रामदास धारसिंगे आणि रमेशआप्पा काकडे यांचा मृत्यू झाला.
हिंगोली मार्गावरील विठ्ठल दालमिलमध्ये हरभर्याची डाळ बनविण्याचे काम सुरू होते. ९ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजता मजुरांच्या अंगावर तीनशे ते चारशे क्विंटल हरभरा असलेली चाडी कोसळली. पोलिसांना दुपारी साडेचारला घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर ढिगाखाली दबलेल्या मजुरांना वाचविण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. सुमारे पाच तास बचाव कार्य सुरू होते. त्यानंतर ढिगार्याखाली दबलेले तीन मृतदेह बाहेर काढण्यात पथकास यश आले. अपघातात दोन मजूर किरकोळ जखमी झाले.