भुयारी गटार साफ करताना तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: November 27, 2014 01:48 IST2014-11-27T01:48:15+5:302014-11-27T01:48:15+5:30
कामगार गॅसमुळे चेंबरमध्ये खेचला गेल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेले अन्य दोन कामगारही चेंबरमध्ये पडल्याने झालेल्या दुर्घटनेत तिघांचा गुदमरून मृत्यू झाला.

भुयारी गटार साफ करताना तिघांचा मृत्यू
नाशिक : गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी उतरलेला कामगार गॅसमुळे चेंबरमध्ये खेचला गेल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेले अन्य दोन कामगारही चेंबरमध्ये पडल्याने झालेल्या दुर्घटनेत तिघांचा गुदमरून मृत्यू झाला.
गंगापूररोडवरील सोमेश्वर गेटजवळ बुधवारी दुपारी ही घटना घडली़ मृत्युमुखी पडलेले दोघे कंत्रटी कामगार, तर एक जेसीबीचालक असून, याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
गंगापूर रोडवरील सोमेश्वर गेटजवळ रस्त्याचे काम सुरू आह़े या कामाजवळच भुयारी गटारीचे चेंबर आह़े चेंबरची साफसफाई करण्यासाठी हिरामण जानू माढे (38) याने चेंबरचे झाकण उघडले अन् तो आतील गॅसमुळे चेंबरमध्ये खेचला गेला़ त्यास वाचविण्यासाठी गेलेले गोपीनाथ धोंडीबा मोरे (45) हो देखील चेंबरमध्ये ओढले गेले. त्यांना वाचविताना जेसीबीचालक प्रशांत चिंधू चौधरी (27) हे सुद्धा चेंबरमध्ये पडले. तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला़ त्यानंतर एका जेसीबीच्या साहाय्याने चेंबरच्या कडेला मोठा खड्डा खणून चेंबरला छिद्र पाडून गॅस बाहेर काढला़ अध्र्या तासानंतर तिघांचेही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल़े (प्रतिनिधी)