वडाळा- चेंबुरदरम्यान फ्रीवेवर भीषण अपघात, ३ ठार
By Admin | Updated: July 19, 2016 12:25 IST2016-07-19T10:20:54+5:302016-07-19T12:25:20+5:30
वडाळा- चेंबूर दरम्यान चार गाड्यांचा भीषण अपघात होऊन ३ जण ठार झाले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

वडाळा- चेंबुरदरम्यान फ्रीवेवर भीषण अपघात, ३ ठार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - वडाळा- चेंबूर दरम्यान चार गाड्यांचा भीषण अपघात होऊन ३ जण ठार झाले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे ईस्टर्न एक्स्प्रेस फ्री वेवर वाहनांची प्रचंड कोंडी झाली असून घाटकोपरकड़े जाणारी वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.
भरधाव वेगाने जाणा-या इनोव्हा गाडीतील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रोड डिव्हायडरवर आपटून पलीकडच्या रस्त्यावर पोहोचली. आणि त्याच वेळी समोरून येणा-या चार गाड्या इनोव्हावर आदळून भीषण अपघात घडला. या घटनेत तीन जण मृत्यूमुखी पडले असून दोघे गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान या मार्गावरून अपघातग्रस्त गाड्या हटवण्यात आल्या असल्या तरीही वाहतूक कोंडी अद्याप कायमच आहे.
( फोटो : सुशील कदम)
(फोटो : सुशील कदम)
पावसामुळे रेल्वे वाहतूक खोळंबली
मंगळवार सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. कुर्ल्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास उशीराने सुरू आहे. वाहतुकीच्या सर्व मार्गांवरील अडचणींमुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.