बेकरीची चिमणी कोसळून जोगेश्वरीत तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:35 IST2017-07-24T05:35:41+5:302017-07-24T05:35:41+5:30

जोगेश्वरी येथे शनिवारी रात्री उशिरा एका बेकरीची चिमणी कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण ठार आणि अन्य दोघे जखमी झाले.

Three dead in Jogeshwar collapsing bakery chimneys | बेकरीची चिमणी कोसळून जोगेश्वरीत तीन ठार

बेकरीची चिमणी कोसळून जोगेश्वरीत तीन ठार

मुंबई : जोगेश्वरी येथे शनिवारी रात्री उशिरा एका बेकरीची चिमणी कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण ठार आणि अन्य दोघे जखमी झाले. जखमींपैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला असून, दुसऱ्यावर कूपरमध्ये उपचार सुरू आहेत. किस्मत अन्सारी (२२), जितेंद्र अन्सारी (२१) आणि तेजी भार्गव (२२) अशी मृतांची नावे आहेत, तर दोन जखमींपैकी एकाला डिस्चार्ज दिला असून, एकावर कूपरमध्ये उपचार सुरू आहेत.
जोगेश्वरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील अक्सा बेकरीच्या चिमणीचा काही भाग लगतच्या गाळ्यावर पडल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या दुर्घटनेत एक महिला आणि चार पुरुष जखमी झाले. जखमींना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, किस्मत अन्सारी (२२) आणि जितेंद्र अन्सारी (२१) यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तेजी भार्गव (२२) यांचा रविवारी पहाटे १ वाजता मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. राजू भारद्वाज (२६) यांच्या डोक्याला मार लागला असून, त्यांना ट्रॉमा केअर रुग्णालयातून कूपर रुग्णालयात नेण्यात आले आहे. अजी मुल्ला (४८) यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या प्रकरणी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Three dead in Jogeshwar collapsing bakery chimneys