वसईत समुद्र किना-यावर सापडले तीन दिवसांचे बाळ
By Admin | Updated: October 21, 2016 14:01 IST2016-10-21T14:01:05+5:302016-10-21T14:01:05+5:30
वसई सुरूचीबाग येथे झाडीमध्ये तीन दिवसांचे बाळ सापडले आहे. झाडीच्या दिशेने रडण्याचा आवाज येत होता.

वसईत समुद्र किना-यावर सापडले तीन दिवसांचे बाळ
ऑनलाइन लोकमत
वसई, दि. २१ - वसई सुरूचीबाग येथे झाडीमध्ये तीन दिवसांचे बाळ सापडले आहे. शुक्रवारी दुपारी समुद्र किना-यावर फिरायला गेलेल्या वसई गावातील दोन महिलांच्या कानावर बाळाच्या रडण्याचा आवाज पडला. झाडीच्या दिशेने रडण्याचा आवाज येत होते.
त्यांनी तिथे जाऊन पाहिले त्यावेळी हिरव्या रंगाच्या कपडयामध्ये बाळाला गुंडाळून ठेवले होते. त्यांनी तातडीने पोलीसाना माहिती कळवली. झाडीमध्ये असल्यामुळे बाळाला भरपूर मच्छर चावली होती.
पोलिसांनी बाळाला सरकारी दवाखान्यात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. बाळ सुखरूप असून बाळाच्या आईचा शोध सुरू आहे