सिलिंडर स्फोटातील मृतांचा आकडा तीन

By Admin | Updated: August 2, 2016 04:03 IST2016-08-02T04:03:09+5:302016-08-02T04:03:09+5:30

घरगुती सिलिंडरमधून गळती झाल्याने झालेल्या स्फोटात गंभीर भाजलेल्या शबाना शेख यांचा गुरुवारी मृत्यू झाला

Three of the cylinders killed | सिलिंडर स्फोटातील मृतांचा आकडा तीन

सिलिंडर स्फोटातील मृतांचा आकडा तीन


कल्याण : घरगुती सिलिंडरमधून गळती झाल्याने झालेल्या स्फोटात गंभीर भाजलेल्या शबाना शेख यांचा गुरुवारी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना सोमवारी दुपारी त्यांच्या मुलगा रेहान शेख (७) याचा सायन रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
आधारवाडीतील रमाबाई आंबेडकरनगर येथे २५ जुलैला रवींद्र गायकवाड यांचे भाडेकरू सलीम शेख यांच्या घरी सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात गायकवाड यांच्या संपूर्ण घराचे प्रचंड नुकसान झाले. तसेच शेजारच्या घरांच्या काचाही फुटल्या. या स्फोटामध्ये शेख कुटुंबातील सलीम, शबाना, अरिफया, रेहान हे गंभीर भाजले. तर, त्यांच्याशेजारी राहणारे धनगर आणि आवारे कुटुंबीयांच्या अंगावर स्फोटामुळे भिंती कोसळल्या. त्यामुळे धनगर यांच्या घरी पाहुण्या आलेल्या ताराबाई गायकवाड (७०) यांचा मृत्यू झाला.

Web Title: Three of the cylinders killed